नगर : भिंगार मधील ब्रम्हनगर परिसरात शौचालयास जाणाऱ्या महिलांची काही तरूणांनी छेड-छाड केली. याबाबत महिलांनी आरडाओरडा केला असता त्यांच्या मदतीला येणाऱ्या दोघांना 15 ते 16 जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.22) रोजी रात्री घडली. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हयाब्रेड ऊर्फ शहाबाद, शहारुख शेख, सोहेल शहा, शोएब शहा, तन्नु ऊर्फ तन्वीर, सलमान शेख, जुबेर खान, अजर खान, भुऱ्या (पूर्ण नाव माहीत नाही), शौकत सुलेमान सय्यद ऊर्फ बब्बू, निसार शेख, तन्नुचा भाऊ, अन्वर शेख, सोनू शेख, शहारुख पठाण रिक्षावाले, टायगर असे आरोपीचे नाव असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहीती अशी की, ब्रम्हनगर परिसरात मोकळ्या जागेत शौचालयासाठी गेलेल्या दोघींना यातील हयाब्रेड ऊर्फ शहाबाद, शहारुख शेख, सोहेल शहा, शोएब शहा यांनी रस्त्यात ऊभे राहून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
त्यावेळी आरडाओरडा केला असता आमचा आवाज ऐकून निलेश सजंय कुऱ्हाडे व आकाश सजंय पवार असे दोघे जन महिलांच्या मदतीला गेले असता चौघांनी दोघांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच त्यांच्या साथीदारांना बोलावून महिलांना व मदतीस आलेल्या दोघांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.