Tamilnadu Politics : ‘त्या’ तीन आमदारांचे राजीनामे स्विकारू नका; अण्णा द्रमुकची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी
एआयएडीएमकेच्या तीन बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यावरून तामिळनाडूतील (Tamilnadu Politics) राजकीय संघर्ष आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे.

Tamilnadu Politics : एआयएडीएमकेच्या तीन बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यावरून तामिळनाडूतील (Tamilnadu Politics) राजकीय संघर्ष आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे.
पक्षप्रमुख पलानीस्वामी यांच्या गटाने मंगळवारी विधानसभा अध्यक्ष जे. सी. डी. प्रभाकर यांची भेट घेऊन, या तीन आमदारांचे राजीनामे स्वीकारू नयेत, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
अण्णा द्रमुकचे मुख्य प्रतोद (व्हीप) ॲग्री एस. एस. कृष्णमूर्ती आणि राज्यसभा खासदार आय. एस. इनबादुराई यांनी अध्यक्षांची (Tamilnadu Politics) भेट घेतली. कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावेळी पक्षादेश डावलून सरकारच्या बाजूने मतदान करणाऱ्या २५ आमदारांना अपात्र ठरवण्याची आमची मुख्य याचिका आधीपासूनच अध्यक्षांकडे प्रलंबित आहे.
पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत होणाऱ्या कडक कारवाईच्या भीतीनेच या तीन आमदारांनी ऐनवेळी राजीनाम्याचे नाटक रचले आहे. मुख्य याचिकेवर निर्णय प्रलंबित असताना अध्यक्षांनी त्यांचे राजीनामे स्वीकारणे नियमांचे उल्लंघन ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या विधी विभागाचे सचिव इनबादुराई यांनी आरोप केला की, राजीनामा सादर केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत या आमदारांना लॅमिनेटेड टीव्हीके सदस्यत्व कार्ड देण्यात आले. आमदारांच्या राजीनाम्याची (Tamilnadu Politics) अधिकृत अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांनी टीव्हीके मंत्र्याची भेट घेऊन पक्षात प्रवेश केला. हे सचिवालय आहे की मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे मुख्यालय? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री विजय यांनी पारदर्शक प्रशासनाचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांचे सरकार घोड्याच्या वेगाने आमदारांची खरेदी-विक्री करत असल्याचा गंभीर आरोप अण्णा द्रमुकने केला आहे. मारगथम कुमारवेल, पी. सत्यभामा आणि एस. जयकुमार या तीन आमदारांनी सोमवारी राजीनामे दिले होते.
आमदारांची गळती थांबेना
अण्णा द्रमुकला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. अंबासमुद्रम मतदारसंघाचे आमदार इसाक्की सुबय्या यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष जे. सी. डी. प्रभाकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
गेल्या दोन दिवसांत राजीनामा देणारे ते चौथे आमदार ठरले आहेत. सुरुवातीला तांत्रिक चुकीमुळे नाकारलेला राजीनामा सुबय्या यांनी काही मिनिटांत हाताने लिहून पुन्हा सादर केला, जो अध्यक्षांनी स्वीकारला.
सुबय्या यांनी १३ मे रोजी झालेल्या बहुमत चाचणीत पक्षादेश डावलून मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या टीव्हीके सरकारच्या बाजूने मतदान केले होते. सोमवारी राजीनामा दिलेल्या इतर तीन आमदारांप्रमाणेच (Tamilnadu Politics) सुबय्या देखील लवकरच टीव्हीके पक्षात अधिकृत प्रवेश करणार असून, आगामी पोटनिवडणुकीत त्यांना टीव्हीके तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे.






