“बाबा, मी आता सहन नाही करू शकत…” ; वडिलांना व्हॉइस नोट पाठवून नववधूने संपवले जीवन

Tamil Nadu bride’s death। तामिळनाडूतील तिरुपूर याठिकाणी एका नवविवाहितेने तिच्या सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. २७ वर्षीय रिधान्याने तिच्या कारमध्ये कीटकनाशकाच्या गोळ्या खाल्ल्यानंतर मृतावस्थेत आढळून आली. कपड्याची कंपनी चालवणाऱ्या अन्नादुराई यांची मुलगी रिधान्या हिने एप्रिलमध्ये २८ वर्षीय कविनकुमारशी लग्न केले होते. या लग्नात ८०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ७० लाख रुपये किमतीची व्होल्वो कार हुंडा म्हणून देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी रिधान्याने तिच्या वडिलांची माफी मागणारे सात व्हॉट्सअॅप ऑडिओ मेसेज पाठवले आहेत.ज्यामध्ये तिने असा आरोप केला आहे कि “हुंड्यासाठी होणार छळ आता ती सहन करू सहन करू शकत नाही.” Tamil Nadu bride’s death।
वडिलांना पाठवलेल्या ऑडिओमध्ये रिधान्याने, ‘कविन आणि त्याच्या पालकांनी माझे लग्न त्याच्याशी लावण्याचा कट रचला होता. मी आता त्यांचा रोजचा मानसिक छळ सहन करू शकत नाही. मला माहित नाही की याबद्दल कोणाशी बोलावे. आणि माझं एकूण घेणारे मला तडजोडीचा सल्ला देत आहेत. ते म्हणतात की आयुष्य असेच चालेल आणि ते माझे दुःख समजू शकत नाहीत. तुम्हालाही वाटत असेल की मी खोटे बोलत आहे, पण तसे नाही. सगळे जण ढोंग करत आहेत आणि मला माहित नाही की मी गप्प का आहे किंवा मी अशी का झाली आहे. पण मला आयुष्यभर तुमच्यावर ओझे बनायचे नाही. यावेळी मी कोणतीही चूक केलेली नाही. मला हे जीवन आवडत नाही.’असे एका नोटमध्ये म्हटले आहे.
दुसऱ्या नोटमध्ये ती पुढे म्हणाली, ‘ते मला मानसिक त्रास देत आहेत तर माझा नवरा मला शारीरिक त्रास देत आहे. मी आता माझे आयुष्य जगू शकत नाही. तुम्ही आणि आई माझे जग आहात. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझी एकमेव आशा होता, पण मी तुम्हाला खूप दुखावले आहे. तुम्ही हे उघडपणे सांगू शकत नाहीत, तरीही तुम्ही मला असे पाहू शकत नाहीस. मी तुमचे दुःख समजू शकते. मला माफ करा बाबा, सगळं संपलं आहे. मी जात आहे'” Tamil Nadu bride’s death।
रविवारी, रिधान्या मोंडिपलायममधील एका मंदिरात जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली आणि वाटेत तिने तिची गाडी थांबवली आणि कीटकनाशकांच्या गोळ्या खाल्ल्या. लोकांनी सेयूर पोलिसांना परिसरात बराच वेळ उभी असलेली कारबद्दल माहिती दिली होती आणि जेव्हा पोलिस गाडी तपासण्यासाठी आले तेव्हा त्यांना रिधान्या तोंडातून फेस येत असताना मृतावस्थेत आढळली.
रिधान्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आला जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. तिचे नातेवाईक न्यायाची मागणी करत बाहेर जमले. कविन कुमार, त्याचे वडील ईश्वरमूर्ती आणि आई चित्रादेवी यांना अटक करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा
आज पुन्हा सोन्याच्या किंमती घसरल्या ; वाचा महिन्याच्या शेवटच्या दिवशी किती आहे भाव ?





