Ragini 3 : प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूर लवकरच रागिणी ३ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामुळे ती बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी अनेक अपडेट सतत समोर येत आहेत. अशातच कास्टिंगबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात अभिनेत्री तमन्ना भाटियाला कास्ट करण्यात आले होते. आता याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ‘रागिणी’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात अभिनेत्री तमन्ना भाटियाचा पत्ता कट करण्यात आला असून तिच्या जागी अभिनेत्री नर्गिस फाखरी हिला कास्ट करण्यात आल्याचे समजते. मात्र, याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ‘रागिणी ३’ मध्ये नर्गिस फाखरी दिसणार हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, तमन्ना भाटिया ‘रागिणी ३’ चित्रपटाचा भाग असणार नाही. निर्मात्यांनी चित्रपटात तमन्ना भाटियाच्या जागी नर्गिस फाखरीला अंतिम केले आहे. त्यामुळे आयुष शर्मा आणि नर्गिस फाखरी ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माते प्रेक्षकांना ‘डेट नाईट हॉरर’चा अनुभव देण्याच्या तयारीत आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी शशांक घोष यांची निवड करण्यात आली आहे. ‘रागिणी ३’ चे दिग्दर्शन करण्यापूर्वी शशांक घोष यांनी ‘खूबसूरत’ (२०१४) आणि ‘वीरे दी वेडिंग’ (२०१८) या चित्रपटांचे दिग्दर्शक केले आहे. निर्मात्यांची हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार जुलै २०२६ पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणावर काम करण्यास सुरूवात केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. रागिणी एमएमएस चित्रपटाचा पहिला भाग २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात राजकुमार राव आणि कायनाज मोतीवाला यांच्या मुख्य भूमिका होत्या. यानंतर २०१४ मध्ये ‘रागिणी एमएमएस २’ आला, ज्यात सनी लिओनी मुख्य भूमिकेत होती. तिने या चित्रपटात बेबी डॅालवर केलेला डान्स चर्चेचा विषय ठरला होता. हेही वाचा : पंजाबच्या गोटात धुसफूस? श्रेयस अय्यरवर खेळाडू नाराज असल्याच्या चर्चा; मालकीण प्रिती झिंटाने सडेतोड उत्तर देत सत्य केलं उघड!