तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भारतीय जनता पक्षाची महायुती अखेर अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील राजकारणात आणि तळेगाव शहरात दीर्घकाळापासून सुरु असलेल्या खलबतांनंतर शुक्रवारी (दि. १४) रात्री ही घोषणा करण्यात आली. महायुतीच्या निर्णयामुळे शहरात नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली असून दोन्ही पक्षांनी उमेदवारांची नावांची पहिली यादी देखील जाहीर केली आहे. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी गणेश भेगडे यांनी संयुक्तपणे महायुतीची घोषणा केली. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून १४ उमेदवार तर भारतीय जनता पक्षाकडून ११ उमेदवार दोन्ही पक्षांना त्यांच्या निवडणूक चिन्हावर उमेदवार उभे करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, गणेश काकडे, सुहास गरुड तसेच भाजपाचे चिराग खांडगे, संतोष दाभाडे उपस्थित होते नगराध्यक्ष पदाचा फॉर्म्युला निश्चित महायुतीमध्ये नगराध्यक्षपदाचे पहिले अडीच वर्षे भारतीय जनता पक्षाला देण्यात आले असून, उर्वरित अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे हे पद जाईल. पहिले अडीच वर्ष भाजपचे अधिकृत उमेदवार संतोष दाभाडे, तर नंतरचे अडीच वर्ष राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्याकडे नगराध्यक्ष पद दिले जाईल. राष्ट्रवादीकडून १५ उमेदवारांची नावे जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांच्या वाट्याच्या १७ पैकी १५ उमेदवार जाहीर केले असून दोन जागांवरचे अंतिम निर्णय प्रक्रियेत आहेत. खांडगे यांनी दोन्ही नावे पुढील काही काळात जाहीर होणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार प्रभागनिहाय यादी पुढीलप्रमाणे प्रभाग १ – आशा अशोक भेगडे प्रभाग २ – संदीप बाळासाहेब शेळके प्रभाग ३ – सिद्धार्थ गोरख दाभाडे प्रभाग ४ – गणेश मोहनराव काकडे प्रभाग ५ – भारती सुरेश धोत्रे प्रभाग ६ – शैलजा कैलास काळोखे प्रभाग ७ – सत्यम गणेश खांडगे प्रभाग ७ – स्नेहा आशिष खांडगे प्रभाग ८ – मनिषा हनुमंत म्हाळसकर प्रभाग ९ – हेमलता चंद्रभान खळदे प्रभाग १० – संगिता सतिश खळदे प्रभाग १० – मजनू हणुमंत नाटेकर प्रभाग ११ – कमल नामदेव टकले प्रभाग १२ – संतोष छबुराव भेगडे प्रभाग १२ – सोनाली गौरव दरेकर (प्रभाग क्रमांक ८ व ९ मधील दोन नावे जाहीर होणे बाकी) भाजपाची यादी प्रदेशाध्यक्षांकडे भाजपाने सात उमेदवारांची नावे प्रस्तावित केली असून ती यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. उर्वरित चार उमेदवारांची नावे लवकरच राज्य पातळीवरून जाहीर केली जाणार आहेत. भारतीय जनता पक्ष उमेदवार प्रभागनिहाय यादी पुढीलप्रमाणे प्रभाग १ – निखिल उल्हास भगत प्रभाग २ – विभावरी रवींद्रनाथ दाभाडे प्रभाग ३ – प्रिया विकी लोखंडे प्रभाग ४ – सिया लक्ष्मण चिमटे प्रभाग ६ – चिराग सुरेश खांडगे प्रभाग ११ – इंद्रकुमार राजमल ओसवाल प्रभाग १२ – विनोद अशोक भेगडे (प्रभाग १३ व १४ मधील चार उमेदवारांची नावे जाहीर होणे बाकी)