Talegaon Dabhade: स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या रौप्यमहोत्सवानिमित्त वृक्षरोपांचे वाटप
Talegaon Dabhade: एक विद्यार्थी - एक झाड हा उपक्रम उत्साहात पार पडला

Talegaon Dabhade: – श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या रौप्यमहोत्सवानिमित्त तसेच कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त एक विद्यार्थी – एक झाड हा उपक्रम उत्साहात पार पडला.
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी आणि कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला पक्षप्रतोद सत्यम खांडगे, नगरसेवक चिराग खांडगे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव पांडुरंग पोटे, उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे, शालेय सचिव मिलिंद शेलार, सहसचिव आणि शालेय समितीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, खजिनदार सुदाम दाभाडे, सल्लागार कुसुम वाळुंज, मुख्याध्यापिका रेणू शर्मा, पर्यवेक्षिका वर्षा देशपांडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात बाळासाहेब शिंदे यांनी शाळेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतीकात्मक स्वरूपात ५० विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सत्यम खांडगे, चिराग खांडगे आणि संतोष खांडगे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करून संगोपन करण्याचे आवाहन केले. सिद्धेश्वर सोनावणे आणि नम्रता साबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आभार उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे यांनी मानले.




