मोठी बातमी ! भाजपाच्या तळेगाव शहर अध्यक्षांचा अचानक राजीनामा, कार्यकर्त्यांना धक्का । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे, दि. 22 (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अशोक दादाभाऊ दाभाडे यांनी तब्येतीचे कारण देत आणि वैयक्तिक कारणांस्तव भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माझ्या आरोग्यविषयी समस्या आणि वैयक्तिक कारणांमुळे मला पक्ष संघटनेसाठी वेळ देता येणार नसल्याने तत्काळ माझा राजीनामा स्विकारावा आणि नवीन शहर अध्यक्षाची नियुक्ती करावी, असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
अशोक दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा 2023 मध्ये घेतली होती. मध्यंतरी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तळेगाव शहरांमधून महायुतीचा उमेदवाराला चांगल्या प्रकारे मताधिक्य सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मिळवून दिले होते. दाभाडे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये कार सेवकांचा सन्मान, अयोध्येमध्ये श्रीरामाच्या दर्शनासाठी तळेगाव शहरातील पक्षाच्या सर्व मोर्चा आघाड्याच्या नियुक्त करणे, तळेगाव मध्ये मतदार वाढीसाठी प्रयत्न करणे तसेच तळेगावातील अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडणे आदी उपक्रम सर्व सहकाऱ्यांच्या समावेत पक्ष वाढीसाठी यशस्वीरित्या पार पाडले.
या सर्व गोष्टी होत असताना त्यांनी आपल्या तब्येतीच्या कारणामुळे स्वखुशीने जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील त्यांच्याकडे राजीनामा दिला आहे. दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते याबाबत चर्चेला उधाण आले आहे. ( Talegaon Dabhade BJP City President Ashok Dabhade Resignation )




