800 रुपयांची लाच घेताना तलाठ्याला अटक
Updated On:

धुळे – सातबारावरील नाव बदलण्यासाठी 800 रुपयांची लाच स्वीकारताना तालाठ्यास अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे असे अटक करण्यात आलेल्या तलाठीचे नाव आहे. बोरसे हा होळनांथे (ता. शिरपूर) येथील तलाठी आहे.
तक्रारदार यांना त्यांच्या सातबारावरील नाव बदलायचे होते. यासाठी ते तलाठी बोरसे यांच्याकडे गेले असता त्यांना 800 रुपयांची लाच मागण्यात आली. मात्र तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तलाठी कार्यालय परिसरात सापळा लावून 800 रुपयांची लाच स्वीकारताना बोरसे यास अटक करण्यात आली. बोरसेविरूद्ध थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.





