जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा; प्रदीप देशमुख यांचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाची वाट न पाहता थेट रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न सोडवण्याचे आवाहन पक्ष कार्यकर्त्यांना केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यकारिणीच्या मॉडर्न महाविद्यालय येथील बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीला मोठ्या संख्येने नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत १० जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बालेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या जिल्ह्यातील अधिवेशन न भूतो न भविष्यती व्हावे, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे काम करावे, असे देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, “पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. पक्षाची सदस्य नोंदणी वाढवण्याबरोबरच प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेत जाऊन काम करावे. अजितदादांच्या विकासात्मक दृष्टिकोनाची झलक लोकांना दिसली पाहिजे.”
आमदार चेतन तुपे म्हणाले, “कार्यकर्ता हाच पक्षाचा पाया आहे. त्यांच्यामुळेच पक्षाला यश मिळते. त्यामुळे विविध महामंडळे आणि समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी द्यावी. मात्र, महायुतीच्या फॉर्म्युल्याचे भान ठेवावे.” माजी आमदार सुनील टिंगरे यांनी कार्यकर्त्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कायम आघाडीवर राहावे, असे आवाहन केले.
यावेळी राजलक्ष्मी भोसले, महेश शिंदे, बाबुराव चांदेरे, सुभाष जगताप आणि दत्ता सागरे यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीला दत्ता धनकवडे, वासंती काकडे, बाबा धुमाळ, नंदा लोणकर, अक्रूर कुदळे, प्रमोद निम्हण, सुषमा निम्हण, उषा कळमकर, शशिकला कुंभार, संतोष फरांदे, प्रदीप गायकवाड, शांतीलाल मिसाळ, शैलेश चरवड, रोहिणी चिमटे, हिना मोमीन, जतिन कांबळे, बाबा पाटील, संतोष नांगरे, अभिषेक बोके, राकेश कामठे, शंतनू जगदाळे, नरेश जाधव, राहूल पायगुडे, गोरख भिकूले, रामदास गाढे, संदीप बधे, समीर चांदेरे, समीर शेख, जयदेव ईसवे, हरेश लडकत, विनोद काळोखे, बाळासाहेब आहेर, विनोद पवार, शुभम माताळे, शितल मेदने, राहुल गुंड, पंकज साठे, अशोक जाधव, पुनम पाटील, संगीता बराटे, रूपेश आखाडे, लावण्या शिंदे, सुशांत ढमढेरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.





