पुणे जिल्हा | आव्हाडांवर कायदेशीर कारवाई करा

जुन्नर, (वार्ताहर) – महाड येथील चौदार तळे येथे मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन करीत असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजकीय स्वार्थापोटी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अपमान केल्याचा निषेध म्हणून भाजप जुन्नरच्या वतीने आव्हाड यांच्या प्रतिमेला चपला मारून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येऊन अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी भाजप नेत्या आशा बुचके, तालुका अध्यक्ष संतोष खैरे, आशिष माळवदकर, निलेश गायकवाड, सचिन खत्री, संजय चिखले, श्रीकांत मिरगुंडे, संजय परदेशी, अमोल भुजबळ, अनिल रोकडे, जयदास साळवे, बाळासाहेब सोनवणे, वैभव परदेशी, नानभाऊ कुर्हाडे, विनोद भगत, संतोष खंडागळे, गणेश सूर्यवंशी, दत्ता वाकचौरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते या निषेध आंदोलनात सहभागी झालेले होते.
जाती-जातीत तेढ निर्माण करून भावना दुखावणारे व राजकीय पोळी भाजणारे एकाच व्यक्तीचे चेले आहेत. मनुस्मृती जळताना डॉ. आंबेडकरांचा फोटो फाडण्याचे जे काम जितेंद्र आव्हाड यांनी केले. या घटनेचा यावेळी तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन उपस्थितांनी आव्हाड यांच्या प्रतिमेला चपलांनी मार दिला.
याबाबत आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन अटक करण्याची मागणी मोर्चाच्या वतीने तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस उपअधीक्षक रवींद्र चौधर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.





