कोंढवा दुर्घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई करा – हर्षवर्धन पाटील

पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये अल्काॅन सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याने भिंतीच्या बाजूला झोपड्या करून राहणाऱ्या १५ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर देशभरातून दुःख व्यक्त करण्यात येत असून या घडनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे त्यांनी या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना श्रद्धांजली वाहिली असून या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर महापालिकेने त्वरित कारवाई करायला हवी अशी मागणी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here