सातारा -करोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1005 जणांचे अहवाल करोनाबाधित आले असून 18 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून शनिवारी संध्याकाळपर्यंत 511 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. या करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि आजअखेर बाधित रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 25 (8465), कराड 246 (26904), खंडाळा 38 (11685), खटाव 158 (19289), कोरेगाव 73 (16559), माण 56 (13059), महाबळेश्वर 20 (4245), पाटण 37 (8318), फलटण 69 (28192), सातारा 224 (39893), वाई 44 (12563) व इतर 5 (1290). जिल्ह्यात आजअखेर करोनाबाधितांची एकूण संख्या एक लाख 90 हजार 462 इतकी झाली आहे. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या आणि आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे आहे. जावळी 1 (192), कराड 8 (794), खंडाळा 0 (149), खटाव 1 (479), कोरेगाव 0 (380), माण 1 (256), महाबळेश्वर 1 (45), पाटण 1 (194), फलटण 0 (280), सातारा 4 (1222), वाई 1 (330). आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4321 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.