बॉलिवूडची हॉट अँड बोल्ड अभिनेत्री ‘उर्वशी रौतेला’ने आपल्या मादक अदांनी भल्याभल्यांना घायाळ केले आहे. उर्वशी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते, आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. उर्वशी जेवढी चांगली अभिनेत्री आहे तेवढीच ती उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे.
नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, यात ती आतापर्यंत न दिसलेल्या अशा अंदाजात दिसली आहे. उर्वशीचा हा लूक तिच्या फॅन्सना आवडला आहे. ब्युटिफूल, फॅब्युलस अशा कमेंट्सच्या तिच्या फोटोवर आल्या आहेत.
उर्वशीने याआधी काही दिवसांपूर्वी असेच हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते ज्यामुळे ती खूप चर्चेत आली होती.
दरम्यान, उर्वशीने “सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून सनी देओलसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते.यानंतर तिचा “हेट स्टोरी 4′ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
उर्वशीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर लॉकडाऊनच्या आधी तिचं “एक डायमंड दा हार लेदे यार’ हे गाणे रिलीज झाले होते. तिच्या या गाण्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.