दिल्ली दंगलीतील आरोपी ताहिर हुसेनचा AIMIM मध्ये प्रवेश ; असदुद्दीन ओवेसींनी दिले ‘या’ जागेवरून तिकीट

Tahir Hussain join AIMIM । असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीन (एआयएमआयएम) देखील दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार आहे. एआयएमआयएमने दिल्ली दंगलीतील आरोपी ताहिर हुसैन यांना मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ताहिर हुसैन यांची पत्नी शमा आणि मुलगा शादाब आज असदुद्दीन ओवेसी यांच्या घरी पोहोचले. या बैठकीला AIMIM नेते इम्तियाज जलीलही उपस्थित होते.
या बैठकीनंतर असदुद्दीन ओवेसी यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केले आणि लिहिले, “ताहिर हुसैन एआयएमआयएममध्ये सामील झाले आहेत आणि आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघातून आमचे उमेदवार असतील. आज त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक मला भेटले आणि पार्टीत सामील झाले.”असे त्यांनी म्हटले आहे.
MCD Councillor Tahir Hussain joined @aimim_national & will be our candidate from Mustafabad Assembly Constituency in the upcoming Delhi Vidhan Sabha elections. His family members & supporters met with me today & joined the party pic.twitter.com/oFnQBlJgOF
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 10, 2024
ताहिर हुसेन तुरुंगात Tahir Hussain join AIMIM ।
दरम्यान, ताहिर हुसैन हा फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीतील आरोपी आहे. त्यांनी आम आदमी पक्षाकडून नगरपरिषदेची निवडणूक जिंकली आहे. मात्र, दंगलीत त्यांचे नाव पुढे आल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. अलीकडेच ताहिर हुसैन यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. दिल्ली दंगलीप्रकरणी ताहिर हुसैन यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर न्यायालयाने रद्द केला होता.
हा एफआयआर 27 फेब्रुवारी 2020 रोजी नोंदवण्यात आला होता. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर झालेल्या दंगल आणि गोंधळ प्रकरणी पीडितांच्या तक्रारीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्ली विधानसभेसाठी फेब्रुवारी 2025 मध्ये निवडणुका होणार आहेत . AAP तिसऱ्यांदा सत्ता राखण्याचा प्रयत्न करत आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने 70 पैकी 62 जागा पक्षाने जिंकल्या होत्या.
एआयएमआयएम इतक्या जागांवर निवडणूक लढणार ? Tahir Hussain join AIMIM ।
दरम्यान, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत AIMIM सुमारे 10 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत मुस्लिम जागांवर तिरंगी लढत होऊ शकते. दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसही आगामी निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत.





