प्रभात वृत्तसेवा वाघोली – वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने तडीपारास केले जेरबंद, हातभट्टी उध्वस्त, जुगार अड्ड्यावर छापा या कारवाया केल्या असून याप्रकरणी गुन्हे वाघोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. तसेच वाघोली येथे दुचाकी प्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेल्या वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकास भावडी येथून जेरबंद केले असून याप्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन उर्फ मोन्या रामप्यारे गिरी (वय 21 रा. भावडी) असे पोलिसांनी जेरबंद केलेल्याचे नाव आहे. त्यास 18 मार्च पासून दोन वर्षासाठी तडीपार केले असताना तो भावडी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.वाघोली गावाच्या हद्दीत खांदवेनगर येथे शेजवळ यांच्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी मटका खेळवणारे व खेळणारे अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगार खेळण्याचे साहीत्य असा एकुण 3935 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. भावडी गावाच्या हद्दीत पाच नंबर चौक, कंजार वस्ती परिसरातील गावठी हातभट्टी दारू तयार भट्टीवर कारवाई करून जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आली आहेत. दारू तयार करणार्या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारवाई 1 लाख 16 हजार रुपये किमतीचे साहित्य व तयार दारू जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले. याप्रकरणी निर्मला गुडदावत व विनोद गुडडावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून दुचाकी चोरी प्रकरणी वाघोली येथे एकास कारवाई दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. संतोष चंद्रकांत पानसरे (वय 49, रा. शेवाळवाडी) असे दुचाकी चोरीप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्याचे नावे आहे. वाघोली येथील बकोरी फाटा, समृद्धी लॉजसमोर एकजण नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीसह संशयितरित्या उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारणा केली असता दुचाकी चोरीची असल्याचे समजले. त्यास चतुःशृंगी पोलिसांच्या हवाली करण्यात आले.