Bhooth Bangla Movie: अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल 16 वर्षानंतर सुपरस्टार अक्षय कुमार आणि कॉमेडी चित्रपटासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक प्रियदर्शन एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात आता लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री झाली आहे.
‘भूत बंगला’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात अभिनेत्री तब्बूची एंट्री झाली आहे. चाहत्यांना आता या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अक्षय कुमार आणि तब्बूला एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहेत. तब्बूने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली असून, तिने चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमार आणि तब्बू दोघेही कलाकार अनेक वर्षांनी सोबत काम करणार आहेत. 2000 साली आलेल्या ‘हेरा फेरी’ या सुपरहिट चित्रपटामध्ये तब्बूने अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबत शेवटचे काम केले होते. त्यामुळे चाहते पुन्हा एकदा दोघांना एकत्र काम करताना पाहण्यास उत्सुक आहेत.
अक्षय कुमार आणि तब्बूसोबतच या चित्रपटामध्ये वामिका गब्बी, राजपाल यादव, परेश रावल हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसतील. हा चित्रपट यावर्षीच्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीला रिलीज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अक्षय कुमारचे यावर्षी अनेक चित्रपट रिलीज होणार आहेत. यामध्ये ‘स्काई फोर्स’, ‘हाउसफुल 5’, ‘जॉली एलएलबी 3’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हेरा फेरी 3’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.