अभिनेत्री तब्बूचं पन्नाशित पदार्पण़

मुंबई- चांदनी बार, माचिस, हतूतू, अस्तित्व, हैदर याच नाही तर सध्याच्या फितूर, अंदाधून यांसारख्या चित्रपटातून साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनेत्री तब्बूचं प्रचंड कौतुक झालं. या सगळ्या चित्रपटातील हटके भूमिका तिच्या पदरात पडल्या आणि उत्तमरित्या पेलल्यासुद्धा आहे.
चाहत्यांच्या लाडक्या अभिनेत्रीने नुकतंच पन्नाशीत पदार्पण केलं. सोशल मीडियावर चाहत्यांसह तिच्या सहकलाकारांनीसुद्धा तिच्यावर शूभेच्छांचा वर्षाव केला. यापुढेही तब्बू वैविध्यपुर्ण भूमिका साकारणार आणि चाहत्यांचं मनोरंजन करणार यात तिळमात्र शंका नाही.
सुरुवातीला व्यावसायिक चित्रपटातून करियरची सुरुवात करणारी तब्बूला मात्र चित्रपटांचं वर्गीकरण मान्य नाही. चित्रपट हा केवळ चित्रपट असतो. मी साकारलेल्या भूमिका मला आवडल्या म्हणून मी साकारल्या, असं ती नेहमी सांगते.
तब्बूने मध्यंतरी गोवा इथं घर घेतलं आणि ती मुंबईसह गोव्यातही दिसू लागली. आगामी काळातल्या तिच्या चित्रपटांविषयी उत्सुकता आहे.. वयाच्या पन्नाशीतही सिंगल असणारी तब्बू आगामी काळात कोणते चित्रपट निवडते याची उत्सुकता आहे.





