Gurucharan Singh | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये रोशन सिंग सोढ़ीची भूमिका साकारणारा टीव्ही कलाकार गुरुचरण सिंह याच्याबद्दल काही दिवसांपूर्वी एक माहिती समोर आली होती. स्वतः गुरुचरणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका सोडल्यानंतरही मागील काही दिवसांपासून गुरुचरण त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे.
गुरुचरण सिंह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये ते हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसतात. त्याचबरोबर त्याच्या हाताला सलाईनही लावले आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी तब्येत खूप खराब झाल्याचे सांगितले. या व्हिडीओमध्ये गुरुचरणने ‘माझी तब्येत खूपच बिघडली आहे. रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या असून माझ्या प्रकृतीबाबतची माहिती तुम्हाला लवकरच देईल,’ असे सांगितले होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होता.
दरम्यान, अश्यातच अभिनेत्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच गुरुचरण सिंह यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून, यामध्ये त्यांनी आपल्या प्रकृतीबद्दल आणि इतर महत्वाच्या गोष्टींवर सविस्तर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना गुरुचरण म्हणाले की, “सध्या ते ठीक आहेत, त्यांची तब्येत हळूहळू सुधारत आहे आणि आता त्यांना पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आहे.
या संवादादरम्यान गुरुचरण सिंह यांनी सांगितले की त्यांनी नेहमीच त्यांचे काम प्रामाणिकपणे केले आहे, परंतु कधीकधी त्यांच्याशी संबंधित अफवा त्यांना त्रास देतात. याबद्दल मोकळेपणाने बोलताना गुरुचरण म्हणाले, “मी प्रत्येक गोष्ट मनापासून विचार करतो, पण लोक त्याचा चुकीचा फायदा घेतात. मला गुरुपूरबाच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. त्या दिवशी मलाही गुरुद्वाराला जायचे होते, पण माझी तब्येत इतकी बिघडली होती की मला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी मला ग्लुकोज दिल्यावर मी शुद्धीवर आले. शुद्धीवर येताच मला वाटले की मी माझ्या सर्व चाहत्यांना शुभेच्छा देतो. मी इच्छा व्यक्त केली आणि माझा तो व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माझ्याशी संबंधित काही चुकीच्या बातम्याही व्हायरल होऊ लागल्या. मला हे सर्व माहीत नव्हते. मी माझ्या मनापासून सर्वकाही विचार करतो, परंतु लोक त्याचा चुकीचा फायदा घेतात. असं अभिनेता यावेळी म्हणाला.
मला अफवांचा राग येतो….
पुढे गुरुचरण सिंह म्हणाले की, ‘एका ठिकाणी मी तारक मेहताच्या सेटवर खूप अनप्रोफेशनल असल्याची बातमी आली होती. ती बातमी वाचून मला खूप राग आला. मी माझ्या आयुष्यातील 13-14 वर्षे या शोसाठी दिली आहेत आणि हे काम मी खूप मनापासून केले आहे. जरी तुमची पाठ मोडली असेल किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल. जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या प्रेमासाठी कठोर परिश्रम करता, तेव्हा सत्य जाणून न घेता तुमच्याबद्दल लिहिलेल्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात. पण या काळात अध्यात्म कामी आले’.
सत्य कसं काय बाहेर आले?
गुरुचरण पुढे म्हणाले की, रागावूनही मी आधी स्वत:ला शांत केले. मग मी शांत बसून बातमी वाचली, तिथे एका स्त्रोताने सांगितले होते असे लिहिले होते, म्हणजे त्यात कोणाचेही नाव नव्हते. तेव्हा असित भाई इथे नव्हते, मग मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा क्रिएटिव्ह हेड सोहेलला फोन केला आणि त्याला विचारले, भाऊ, तुमच्यासोबत असे काही घडले आहे का? मी सेटवर अनप्रोफेशनल होतो का?
मग तो म्हणाला – नाही. मग मी त्याला म्हणालो की मग तुला माझ्यासोबत लाईव्ह यावं लागेल आणि सांगावं लागेल की मी एक प्रोफेशनल अभिनेता आहे. अन्यथा ही बातमी खरी आहे असे मला वाटेल. सोहेलने लाइव्ह येण्यास होकार दिला. तो माझ्यासोबत थेट आला आणि माझे सत्य सांगितले. ते प्रकरण तिथेच संपले. खरे तर माझ्यासाठी माझे काम हीच माझी पूजा आहे. अशा खोट्या अफवा पसरवून तुम्ही कोणावरही खोटे आरोप करू शकत नाही. आणि लवकरच मी पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.