#T20WorldCup : टी-20 विश्वकरंडकासह ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठीही #TeamIndia संघ जाहीर

मुंबई – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक #T20WorldCup क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. फारसा धक्का न देता निवड समितीने अगदी थोडे बदल केले आहेत. संघात दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेल्या जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांचा समावेश केला आहे, तर दुखापतीमुळे अष्टपैलू रवींद्र जडेजा या स्पर्धेला मुकणार आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसह मायदेशात होत असलेल्या #INDvAUS ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका #INDvSA यांच्याविरुद्धच्या मालिकांसाठीही संघ जाहीर करण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या निवड समितीच्या झालेल्या बैठकीत हा #TeamIndia संघ जाहीर करण्यात आला. जडेजाच्या जागी अक्सर पटेलला संधी देण्यात आली असून, लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहलने संघातील स्थान राखले आहे. आशिया करंडक स्पर्धेत सातत्यपूर्ण गोलंदाजी केलेल्या नवोदित अर्शदीप सिंगला संघात स्थान देण्यात आले असून, यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंत व दिनेश कार्तिक या दोघांचेही संघातील स्थान कायम ठेवले आहे. निराशाजनक कामगिरीमुळे आवेश खानला वगळण्यात आले आहे.
One title 🏆
One goal 🎯
Our squad 💪🏻#TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/Dw9fWinHYQ— BCCI (@BCCI) September 12, 2022
अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमीला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. राखीव खेळाडूंत शमीसह श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई व दीपक चहर यांचा समावेश करण्यात आला आहे. दीपक हुडावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला असून, रवीचंद्रन अश्विनलाही संघात आणखी एक संधी देण्यात आली आहे. आशिया करंडक स्पर्धेत संमिश्र कामगिरी केलेल्या भुवनेश्वर कुमारचेही स्थान कायम ठेवले गेले आहे.
ऑस्ट्रेलियातील वातावरण व खेळपट्ट्यांचे स्वरूप पाहता संघात वेगवान गोलंदाजांचा भरणा जास्त केला गेला आहे. तसेच आशिया करंडक स्पर्धेत फारशी चमकदार कामगिरी करता आली नसली तरीही लोकेश राहुललाही संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या भारतात होत असलेल्या मालिकेसाठी मुख्य संघात अनुभवी महंमद शमीला स्थान देण्यात आले आहे. मात्र, टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याला राखीव खेळाडूत सहभागी केले गेले आहे.
टी-20 विश्वकरंडकासाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (अतिरिक्त यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्सर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (अतिरिक्त यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्सर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, महंमद शमी.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (अतिरिक्त यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्सर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, महंमद शमी, दीपक चहर.





