T20 World Cup – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज टी-२० विश्वचषकातील ( T20 World Cup ) सराव सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला ६ धावांनी विजय मिळवण्यात यश आले. या रोमहर्षक सामन्यात दोन्ही संघांनी दमदार खेळ दाखवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या बळावर संघाने २० षटकांत १८७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला दिले. कांगारूंकडून फलंदाजीत त्यांच्या कर्णधार ऍरॉन फिंचने दमदार फलंदाजी केली. मात्र विराट कोहलीच्या अविश्वसनीय क्षेत्ररक्षणासमोर ऑस्ट्रेलिया संघ पराभवाचा बळी ठरला.
T20 WorldCup | आशिया चषक जिंकणाऱ्या श्रीलंकेला चक्क नामिबियाने नमवले
ऑस्ट्रेलियन संघाला शेवटच्या दोन षटकात मोजक्या धावांची गरज असताना विराट कोहलीने १९ व्या षटकात कांगारूंचा स्फोटक फलंदाज टीम डेव्हिड याला अफलातून धावबाद केले. त्यानंतर २० व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने विरोधी संघाच्या पॅट कमिन्स याचा जबरदस्त झेल टिपला. विराटच्या या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाला हातातून निसटलेला सामना जिंकण्यात यश आले.
भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांकडून चांगली कामगीरी पाहायला मिळाली. हर्षल पटेल आणि मोहम्मद शमी यांच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया शेवटच्या १२ चेंडूत १६ धावांची आवश्यकता असतानाही भारताने ६ धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यात महत्वाचं म्हणजे शमीने फक्त एकच षटक टाकले आणि त्यातही एक धावबाद, एक झेलबाद आणि दोन त्रिफळाचित अशा चार गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या या एका षटकातील गोलंदाजीची सर्वच जण प्रशंसा करत आहेत.
#T20WorldCup | स्पर्धेत ICC कडून काही नियमांत पुन्हा बदल, सामन्यात पाऊस पडला तर….
What A Win! 👌 👌#TeamIndia beat Australia by 6⃣ runs in the warm-up game! 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/3dEaIjgRPS #T20WorldCup | #INDvAUS pic.twitter.com/yqohLzZuf2
— BCCI (@BCCI) October 17, 2022
या सामन्यात भारतीय फलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली. मात्र विराट कोहली, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना काही खास कामगिरी करता आली नाही. यानंतर आता भारताला १९ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध एक सराव सामना खेळायचा आहे. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकातील ( T20 World Cup ) पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी खेळायचा आहे.
King Kohli magic on the feild warra one handed catch by Virat Kohli…… 😍👀#ViratKohli #INDvsAUS #WarmUp #T20WorldCup2022 #runout #catch #shami pic.twitter.com/lJ2j5g6Wvw
— Ps Virat Kohli Fan (@ps_viratkohli18) October 17, 2022
VIRAT KING KOHLI RUN OUT TIM DAVID 😍#KingKohli #ViratKohli #INDvsAUS #T20WorldCup2022 #runout #harshalpatel pic.twitter.com/Aue3ULrZdo
— Ps Virat Kohli Fan (@ps_viratkohli18) October 17, 2022