चेन्नई : अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (एएमएमके) 2026 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या युतीची भूमिका फेब्रुवारीनंतरच ठरवेल, असे पक्षाचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन यांनी सांगितले. अंडिपट्टी येथे माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनकरन यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर ते म्हणाले की. एएमएमके राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाली असून तिला विधानसभेच्या सहा जागा मिळाल्या आहेत, या बातम्या अफवा आहेत. एएमएमके तामिळनाडूमध्ये एक अपरिहार्य राजकीय शक्ती म्हणून उदयास आली आहे आणि सर्व प्रमुख राजकीय पक्ष युतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. आम्ही कोणत्याही आघाडीत सामील झाले तरी, एएमएमके अंडिपट्टीमधून आपला उमेदवार उभा करेलच.