T-20 WC Final : विल्यम्सनची झंझावाती खेळी; ऑस्ट्रेलियासमोर न्यूझीलंडचं १७३ धावांचं आव्हान
Updated On:

दुबई – कर्णधार केन विल्यम्सनच्या झंझावाती खेळीची जोरावर न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १७३ धावांचं आव्हान ठेवलं.
नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. यामध्ये केन विल्यम्सनने सर्वाधिक ८५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर ऍडम झाम्पाने एक गडी बाद केला.
न्यूझीलंडची सुरुवात अडखळत झाली. सलामीवर मिचेल डेरिल ११ धावा करून बाद झाला. तर मार्टीन गुप्टीलने २८ धावा केल्या. दरम्यान विल्यम्सनने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली. विल्यम्सनने ४८ चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला १७२ धावांची मजल मारता आली.

