Syed Modi International 2024 : पी.व्ही सिंधू अन् लक्ष्य सेनची दुसऱ्या फेरीत धडक…

Syed Modi International 2024 : अव्वल मानांकित पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी बुधवारी लखनौ येथील सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत सरळ गेममध्ये विजय मिळवत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने उदयोन्मुख शटलर अनमोल खरब हिचा 21-17, 21-15 असा पराभव केला तर 2021 च्या जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लक्ष्यने मलेशियाच्या पात्रतावीर शोलेह एडिलचा 21-12, 21-12 असा पराभव केला.
🏸 PV Sindhu kicks off her campaign with a commanding win!
She defeated rising star Anmol Kharb with a score of 21-17, 21-15 in the opening round of the Syed Modi India International (Super 300).
A strong start for the two-time Olympic medallist! 🇮🇳💪#SyedModiInternational… pic.twitter.com/wXoMxrDNiA
— Doordarshan Sports (@ddsportschannel) November 27, 2024
दोन वर्षांनंतर स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या सिंधूचा पुढील सामना देशबांधव इरा शर्माविरूध्द होईल. इरा शर्मा हिने सलामीच्या लढतीत दीपशिखा सिंग हिचा 21-13, 21-19 असा पराभव केला होता. तर दुसरीकडे लक्ष्यापुढे दुसऱ्या फेरीत इस्रायलच्या डॅनिल डुबोव्हेंको याचे आव्हान असेल.
पुरुष एकेरीतील अन्य लढतीत भारताच्या किरण जॉर्ज, आयुष शेट्टी आणि मेराबा लुवांग मेसनम यांनीही दुसरी फेरी गाठली आहे. महिला एकेरीत द्वितीय मानांकित मालविका बनसोड, अनुपमा उपाध्याय, ईशाराणी बरुआ, देविका सिहाग, उन्नती हुडा, तस्नीम मीर आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनाही पुढील फेरीत प्रवेश करण्यात यश आले.
मालविकाने व्हिक्टोरिया दबाकसिंकाचा 21-16, 21-07 असा पराभव केला तर अनुपमाने अझरबैजानच्या केशा फातिमा अजहराचा 19-21, 22-20, 21-15 असा पराभव केला. तर उन्नतीने थायलंडच्या थामोनवान नितितिकराईचा 21-12, 21-16 असा पराभव केला. पुरुष एकेरीत किरण जॉर्जने आलम मिश्राचा 21-12, 23-21 असा तर आयुष शेट्टीने रघु मारिस्वामीचा 21-18, 15-21, 21-16 असा पराभव केला तर मेराबा लुवांग मेस्नामने थायलंडच्या सरन जमसरीचा 14-21, 21-19, 21-10 असा पराभव केला.





