#SyedModiSuper300 : सौरभ वर्मा अंतिम फेरीत
Updated On:

लखनौ : भारताच्या सौरभ वर्माने सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीत २६ वर्षीय सौरभने कोरियाच्या हेओ क्वांग हीवरचा २१-१७, १६-२१, २१-१८ असा पराभव करत विजय संपादित केला.
सौरभची आता विजेतेपदासाठी आठव्या मानांकित वांग त्झू वेइविरूध्द लढत होईल. वांग हा जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानावर आहे, तर सौरभ हा ३६ व्या स्थानावर आहे. यापूर्वी वांग-सौरभ दोन वेळा आमनेसामने आले असून, दोघांनी प्रत्येकी एक लढत जिंकली आहे.

