Swiggy Q4 results: स्विगीचा चौथ्या तिमाहीतील तोटा घटला; महसुलात 45 टक्क्यांची वाढ
Swiggy Q4 results: दरम्यान, कंपनीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत एकूण खर्च ७,४४८ कोटी रुपये इतका झाला असून, मागील वर्षी तो ५,६१० कोटी रुपये होता.

Swiggy Q4 results: ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स क्षेत्रातील स्विगी कंपनीचा मार्चअखेर संपलेल्या २०२५-२६ आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील एकत्रित निव्वळ तोटा कमी झाला आहे. कंपनीला या तिमाहीत ८०० कोटी रुपयांचा तोटा झाला असून, मागील वर्षी याच कालावधीत हा तोटा १,०८१ कोटी रुपये होता.
हेही वाचा – रुपया 25 पैशांनी घसरून 94.47 च्या पातळीवर; पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम
इन्स्टामार्टची मालकी असलेल्या स्विगीच्या महसुलात मात्र मोठी वाढ नोंदविण्यात आली. जानेवारी-मार्च २०२६ तिमाहीत कंपनीचा महसूल जवळपास ४५ टक्क्यांनी वाढून ६,३८३ कोटी रुपयांवर पोहोचला. मागील वर्षी याच तिमाहीत महसूल ४,४१० कोटी रुपये होता.
दरम्यान, कंपनीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत एकूण खर्च ७,४४८ कोटी रुपये इतका झाला असून, मागील वर्षी तो ५,६१० कोटी रुपये होता.





