Jejuri Accident : जेजुरीमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू

जेजुरी : जेजुरीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्विफ्ट कार आणि पिक अप टेम्पोमध्ये हा अपघात झाला. मृत पावलेल्यांमध्ये एका महिलेचादेखील समावेश आहे. जेजुरी मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोर संध्याकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
काय घडले नेमके?
किर्लोस्कर कंपनीसमोरील श्रीराम हॉटेलमध्ये पिक अप टेम्पोमधील साहित्य उतरवण्याचे काम सुरू होते, त्यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पिक अप टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये टेम्पोमधून साहित्य काळी उतरवणारे तसंच हॉटेलचे मालक आणि कारमधील असे 8 जण जागीच ठार झाले आहेत.
हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामध्ये दोन मुले आणि एक महिला तसंच दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मयताची नावे खालील प्रमाणे
1 )सोमनाथ रामचंद्र वायसे (राहणार नागरिक तालुका पुरंदर जिल्हा पुणे)
2) रामू संजीवनी यादव (राहणार नागरिक तालुका पुरंदर जिल्हा पुणे)
3 अजय कुमार चव्हाण (राहणार उत्तर प्रदेश)
4) अजित अशोक जाधव (राहणार कांजळे तालुका भोर जिल्हा पुणे)
5) किरण भारत राऊत (राहणार पवारवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे)
6) अश्विनी संतोष एस आर (राहणार सोलापूर)
7) अक्षय संजय राऊत (राहणार झारगडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे)
8) एक अनोळखी पुरुष असे मयत झालेले आहेत.
ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला. अपघातात इतकी मोठी हानी झाली असून, आठ जण दगावले गेले आहेत. या अपघातामध्ये लहान मुलं वाचली असून, पोलिसांना मी त्यांच्यासाठी सर्वोत्तम उपचार करण्याचं सांगितले आहे. प्रचंड दुर्दैवी अशा प्रकारचा हा अपघात आहे. काहींनी मला अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ पाठवले ते पाहून भयंकर चित्र डोळ्यांसमोर होतं. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो.
विजय शिवतारे आमदार पुरंदर हवेली विधानसभा





