Swatantrya Veer Savarkar: मराठमोळ्या अभिनेत्याने दिला सावरकरांच्या भूमिकेला आवाज; रणदीप हुड्डाने केले कौतुक

Swatantrya Veer Savarkar Film| बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा लवकरच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सध्या त्याच्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. यात रणदीप स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. हा चित्रपट हिंदी सोबतच मराठी भाषेतही रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या मराठी आवृत्तीत सुबोध भावेने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांच्या भूमिकेला आवाज दिला आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात पार पडला. यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारणारे रणदीप हुड्डा यांच्यासह चित्रपटाची टीम उपस्थित होती. रणदीपने यावेळी सुबोधचे कौतुक केले. तसेच या भूमिकेला त्याचा आवाज देण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा देखील केला आहे. Swatantrya Veer Savarkar Film|
View this post on Instagram
रणदीप म्हणाला, ‘मराठी भाषेच्या डबिंगसाठी सुबोध भावे यांचंच नाव माझ्या डोक्यात होतं. मी माझ्या टीमला सांगितलं, काहीही करा पण सुबोध भावे यांना आवाज देण्यास सांगा. मी त्यांचे चित्रपट पहिले आहेत. तेच फक्त या भूमिकेला न्याय देऊ शकतील असं मला वाटत होतं. महाराष्ट्रातील लोकांना फक्त सुबोध भावे यांचाच आवाज भावेल, अशीही मला खात्री आहे’ असा खुलासा केला आहे. Swatantrya Veer Savarkar Film|
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा 22 मार्च 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकिता लोखंडेनेही या चित्रपटात वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. रणदीप हुड्डा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे आणि त्यानेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
हेही वाचा:
Parrot fever । पॅरोट फिव्हरमुळे ५ जणांचा मृत्यू, जाणून घ्या,काय आहे ‘हा’ आजार आणि कसा पसरतो ?





