स्वारगेट पोलीसांकडून वाघाच्या कातड्याची तस्करी करणारा जेरबंद

पुणे – वाघाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून पंधरा लाख रुपयांचे वाघाचे कातडे हस्तगत करण्यात आले. शकीलजान महंमद शेख (रा -अप्पर डेप्पो ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वारगेट पोलिसांचे गस्ती पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना शेख हा सारसबाग येथे वाघाची कातडी व नखे घेऊन विकण्यासांठी येत असल्याची खबर मिळाली. त्यानूसार सारसबाग येथील कोथरुड बस थांब्यांवर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता, त्यामध्ये वाघाचे कातडे व नखे सापडली. याची माहिती वनविभागास कळविण्यात आली. यानंतर वन अधिकाऱ्यांनी कातड्याची पडताळणी केली. त्यांनी हे कातडे व नखे वाघाचीच असल्याची खात्री केल्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यानूसार स्वारगेट पोलीस ठाण्यात शेख विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक सुरेश जायभाई, पोलीस हवालदार महेंद्र जगताप, सचिन कदम, पोलीस हवालदार पाटील, पंढरीनाथ शिंदे, मुंडे, विजय कुंभार, विजय खोमणे, सचिन दळवी, वैभव शीतकाल, अमित शिंदे, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, शंकर गायकवाड यांच्या पथकाने केली.

शेख हा गॅरेजमध्ये काम करतो, त्याने कातडे नाशिकवरुन आणले होते. कातडे त्याला नाशिकमधील एका व्यक्तीने विकायला दिले होते. यामध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.