स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा ‘या’ आमदारासोबत फोटो; आमदारांनी केला ‘हा’ खुलासा

Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी नराधम दत्तात्रय गाडे अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा पत्ता देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस देखील पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. 10 पेक्षा अधिक पथके देखील गाडेला शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. अशातच आरोपी गाडे याचा पुणे जिल्ह्यातील आमदारांसोबत एक फोटो व्हायरल होत आहेत. यावरून तो राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.
दरम्यान, प्रकरणातील नराधम आरोपीचे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा रंगली आहे. दत्तात्रय गाडे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. दत्तात्रय गाडेने शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो सोशल मीडियाच्या डीपीला ठेवला आहे. तर शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऱ्या बॅनवरही दत्तात्रय गावडेचा फोटो असल्याचे समोर आले आहे.

शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोकबापू पवार यांच्या एका वाढदिवस शुभेच्छा पोस्टरवरदेखील स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडे दिसत आहे.
दत्तात्रय गाडे याचे आमदार आणि माजी आमदाराच्या एका फ्लेक्सवरही फोटो असून आमदार माऊली कटके यांचा फोटो त्याने व्हॉट्सअॅप डीपीला ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दत्ता गाडे हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

फोटो : स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेचा शिरूरचे आमदार माऊली कटके यांच्यासोबत असलेला फोटो व्हायरल होत आहे.
दत्तात्रय गाडेशी कोणताही संबंध नाही – आमदार कटके
दत्तात्रय गाडेशी आपला कोणताही संबंध नाही, आपण त्याला ओळखतही नाही, असा खुलासा आमदार माऊली कटके यांनी केला आहे. मी मतदारसंघांतील 10 हजार पेक्षा जास्त लोकांना देवदर्शन करून आणले आहे. अनेक कार्यकर्ते मतदारसंघात फिरत असताना फोटो काढत असतात. माझा संबंधित व्यक्तीसोबत फोटो असला तरी त्याचा आणि माझा कसलाही संबंध नाही, असे माऊल कटके यांनी स्पष्ट केले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि केस फास्टटॅ्क कोर्टात हा खटला चालवावा, अशी माझी मागणी असल्याचेही ते म्हणाले.

आरोपी गाडेचा पत्ता सांगणाऱ्यास पोलिसांकडून एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.





