‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मधील खाशाबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे 29 व्या वर्षी निधन

मुंबई – प्रसिद्ध ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील खाशाबाची भूमिका साकारणारा अभिनेता उज्ज्वल धनगरचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यूसमाई तो अवघ्या 29 वर्षाचा होता. उज्ज्वलच्या अशा अकाली जाण्याने मंनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
https://www.facebook.com/gaurav.more.12/posts/4114871141923680
सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अभिनेत्याच्या छाती आणि पोटात दुखायला लागले. त्यामुळे तो टिटवाळा येथील महागणपती रुग्णालयात दाखल झाला. अॅसिडिटीच्या शक्यतेमुळे औषध घेऊन तो घरी परतला. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने तो रुग्णालयात गेला. परंतु उपचारादरम्यान त्याने जगाचा निरोप घेतला. उज्वलच्या पार्थिवावर टिटवाळा स्मशानभूमीत अंत्यसंकार करण्यात आले आहे.
उज्ज्वलने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’सोबतच ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतही खाशाबाची व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय ‘क्राईम पेट्रोल’, ‘लक्ष्य’ यासारख्या मालिकांमध्येही त्याने काम केले होते. अनेक कार्यक्रमांचे निवेदनही त्याने केले आहे.





