स्वरा भास्करचा इस्त्राइलवर हल्ला करणाऱ्या पॅलेस्टाईनला पाठिंबा; म्हणाली “लोक ढोंगी वाटतात”

मुंबई – अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) अभिनयापेक्षा तिच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. विविध मुद्द्यांवर ती स्पष्टपणे भाष्य करताना दिसते. सध्या इस्त्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध सुरू असून यात हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या युद्धादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक कलाकारांनी भाष्य केले आहेत. यातच अभिनेत्री स्वरा भास्करनेही याप्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
स्वरा भास्करने तिच्या इनस्टा स्टोरीवर लिहिले की, “जेव्हा इस्त्राइलने पॅलेस्टाईनवर हल्ला केला, पॅलेस्टिनी लोकांची घरं उद्ध्वस्त केली, ती काबीज केली. तेव्हा पॅलेस्टाईनची मुले आणि किशोरवयीन मुलींना देखील सोडले नाही. जवळपास 10 वर्षे सतत गाझावर हल्ले आणि बॉम्बस्फोट केले, तेव्हा तुम्हाला धक्का बसला नसेल. म्हणून मला इस्रायलवरील हल्ल्याबद्दल शोक करणारे लोक ढोंगी वाटतात.”
स्वरा भास्कर इनस्टा स्टोरी –
यासह स्वराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर अनेक लोकांच्या पोस्टही शेअर केल्या आहेत. स्वराने केलेल्या या पोस्टचे अनेकांनी समर्थन केले आहे. तर काही जणांनी तिला ट्रोलही केले आहे. या युद्धादरम्यान, नुसरुत भरुचा इस्त्रायलमध्ये अडकली होती. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी ती इस्त्रायलमध्ये गेली होती. मात्र आता नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) भारतात परतली आहे. शुक्रवारी रात्री पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने इस्त्रायलवर हल्ला केल्यामुळे ती इस्त्रायलमध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती.
युद्धानंतर तिच्याशी संपर्क तुटल्याने कुटुंबासह तिचे चाहते चिंता व्यक्त करत होते. मात्र, आता नुसरत आपल्या मायदेशी भारतात परतली आहे. नुसरत भरुचा इस्त्रायलहून मुंबई विमानतळावर पोहोचली असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.






