स्वरा भास्कर पुन्हा चर्चेत! नागपूर हिंसाचार, विकी कौशलवर ट्वीट, वाचून धक्काच बसेल.. जाणून घ्या नक्की म्हणाली?

Swara Bhaskar | अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावरील ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. स्वराने नागपूर हिंसांचार आणि कुणाला कामरा प्रकरण यावर ट्वीट केले आहे. तिने केलेले ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नागपूर राड्यासाठी अभिनेता विकी कौशल आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना जबाबदर धरले आहे, तर कुणाला कामारा याची बाजू घेतली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. यामुळे स्वराचे ट्वीट वादात सापडण्याची शक्यता आहे.
याविषीय स्वराने दोन पोस्ट लिहिल्या आहेत. छावा सिनेमा प्रक्षोभक होता. नागपूर येथील झालेल्या राड्यासाठी विकी कौशल आणि निर्माते जबाबदार आहेत. सिनेमावर बंदी घातली पाहिजे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये कामरा याचा शो एक कॉमेडी शो आहे. झालेल्या तोडफोडीसाठी शिंदे कार्यकर्ते जबाबदार आहे.
सध्या सोशल मीडियावर तिने केलेल्या ट्वीटची चर्चा होत आहे. पण तिच्या या पोस्टमुळे तिला टीकेचा सामाना करावा लागत आहे, अशातच अभिनेत्री स्वराने याविषयी हे ट्वीट फेक असल्याचे स्पष्टीकरण तिने दिले आहे. तुम्ही फॅक्ट तपासून पाहा, असे तिने म्हटले आहे.
RW idiots back to what they do best- spreading fake images and memes. pic.twitter.com/8Mw1UQbiAU
— Swara Bhasker (@ReallySwara) March 25, 2025
स्वराने ट्वीटचे स्क्रिनशॅाट शेअर केले आहेत. मुर्ख उजव्या विचारसणीच्या लोकांनी तेच काम करणे सुरु केले आहे. ज्यामध्ये ते उत्तम आहेत. फोक फोटो आणि मीम्स व्हायरल करणे, असे स्पष्टीकरण तिने दिले आहे. स्वरा भास्कर मिसेज फलानी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





