Swara Bhaskar Fahad Ahmad: लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त स्वरा भास्करने शेअर केले खास फोटो; फहाद अहमदची भावूक पोस्ट चर्चेत
स्वराने त्यांच्या कोर्ट मॅरेजमधील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले. तसेच रिसेप्शन मधील एक न पाहिलेला व्हिडिओही पोस्ट केला. फोटो शेअर करताना स्वराने लिहिले की, “असं करता करता तीन वर्षे पूर्ण झाली! आपण तिघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. कितीही अडचणी, भांडणं आली तरी आपण नेहमी एकमेकांच्या सोबत राहू. एकमेकांचा सन्मान करू आणि आयुष्यभर प्रेम करत राहू.”

Swara Bhaskar Fahad Ahmad: १६ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचे पती फहाद अहमद यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली. या खास दिवशी दोघांनीही सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त केले.
View this post on Instagram
स्वराने त्यांच्या कोर्ट मॅरेजमधील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले. तसेच रिसेप्शन मधील एक न पाहिलेला व्हिडिओही पोस्ट केला. फोटो शेअर करताना स्वराने लिहिले की, “असं करता करता तीन वर्षे पूर्ण झाली! आपण तिघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. कितीही अडचणी, भांडणं आली तरी आपण नेहमी एकमेकांच्या सोबत राहू. एकमेकांचा सन्मान करू आणि आयुष्यभर प्रेम करत राहू.” तिने पुढे लिहिले की, “तुझ्यासोबत हे आयुष्य मिळाल, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.”
View this post on Instagram
फहाद अहमद यांनीही स्वरासोबतचा फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली. त्यांनी म्हटले की, “या तीन वर्षांत मी तुझ्यामुळे अधिक चांगला माणूस झालो आहे. तू माझा संयम वाढवला, स्वभाव घडवला आणि माझ्या ध्येयांमध्ये साथ दिलीस. तुझं प्रेम मला दिशा देतं आणि तुझी ताकद मला उद्दिष्ट देते.”
स्वरा आणि फहाद यांनी १६ फेब्रुवारी २०२३ रोजी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत विवाह नोंदवला होता. सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांनी आपली मुलगी राबिया हिचं स्वागत केलं. हे दोघे पति पत्नी और पंगा या रिअॅलिटी शोमध्येही एकत्र दिसले होते.





