Swapnil Joshi: स्वप्नील जोशीने अपघात झाल्याच्या वृत्तांवर सोडलं मौन; व्हिडिओ शेअर करत दिलं स्पष्टीकरण
Swapnil Joshi : स्वप्नील जोशी सध्या 'लग्नपंचमी' या नाटकात पाहायला मिळत आहे.

Swapnil Joshi : मराठी अभिनेता स्वप्नील जोशी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्नील जोशीचा अपघात झाला असून, त्याला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले होते.
मात्र या सर्व अफवा असल्याचे स्वप्नीलने एक व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे. अपघाताच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, तब्येत पूर्णपणे ठीक असल्याचं त्याने व्हिडीओतून सांगितलं.
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्वप्नील जोशीने म्हटले की, ‘नमस्कार मी स्वप्नील जोशी. कालपासून माझ्या कानावर एक गोष्ट येत आहे. आता त्याचा प्रचार आणि प्रसार वाढतो आहे. अशी कुठेतरी यूट्यूबवर बातमी आली की, माझा अपघात झाला आहे.
View this post on Instagram
मला गंभीर दुखापत झाली आहे. बाकी सगळं अफवा वगैरे ठीक आहे. माझ्या प्रियजनांचे, चाहत्यांचे, नातवाईकांचे, मित्र मंडळींचे सगळ्यांचे मेसेज येत होते. फोन येत होते. माझ्या तब्येतीची विचारपूस करत होते’.
‘मी ठणठणीत बरा आहे. मला काहीही झालेलं नाही, ही सगळी अफवा आहे. आता मी बोरिवलीत ‘लग्नपंचमी’चा प्रयोग करतो आहे. तुमच्या आशीर्वादाने आणि प्रेमामुळे मी ठणठणीत आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या प्रत्येकाचे आभार, की ही बातमी खरी आहे की खोटी, हे तपासण्याचा प्रयत्न केला. मनापासून धन्यवाद. मी बरा आहे’, असं स्वप्नील जोशीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
त्याने व्हिडीओ शेअर करत, ‘मी बरा आहे अफवांवर विश्वास ठेवू नका, तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि काळजी बद्दल मनापासून आभार,’ असे कॅप्शनही दिलं आहे. दरम्यान, स्वप्नील जोशी सध्या ‘लग्नपंचमी’ या नाटकात पाहायला मिळत आहे.
हेही वाचा:
Gen Z Regelt Protest: फ्रान्सपाठोपाठ जर्मनीतही Gen-Z आंदोलनाला हिंसक वळण





