Pimpri : माणमध्ये पंचायतराज अभियानांतर्गत स्वच्छता दिंडी

हिंजवडी : आयटीनगरी म्हणून जगभरात ओळख झालेल्या माण ग्रामपंचायतने सरकारच्या महत्वकांक्षी ” मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत संपूर्ण गावात वाड्यावस्त्यावर जनजागृतीसाठी ” स्वच्छता दिंडी” चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावातील महिला बचत गट, भजनी मंडळ, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, मान ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सुमारे 300 ते 400 नागरिक व विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी गावतील रस्ते, क्रीडांगण, मैदाने तसेच मंदिर परिसरात स्वच्छता करून देशी झाडांच्या रोपांची वृक्षलागवड करण्यात आली.
या स्वच्छता दिंडीमध्ये सहभागी झालेल्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी दैनंदिन गृहपयोगी भांडी ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच अर्चना सचिन आढाव , ग्रामविकास अधिकारी मदन हरिभाऊ शेलार, ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप साठे, छाया ओझरकर, युवा नेते सचिन आढाव, विकास सोसायटीचे चेअरमन बापूसाहेब भोसले यांच्या हस्ते सहभागी महिलांचा गौरव करण्यात आला.
” नियोजनबद्ध विकासकामांच्या जोरावर माण ग्रामपंचायतने यापूर्वी केंद्र व राज्यसरकार तसेच जिल्हा प्रशासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आम्ही प्रत्येक बाबींवर काम करत असून लोकसहभाग व शासनाने घालून दिलेल्या अटीशर्थीचे आम्ही तंतोतंत पालन करत यंदाच्या पुरस्कारासाठी आम्ही सचोटीने प्रयत्न करत आहोत.
अर्चना आढाव, सरपंच, माण ग्रामपंचायत
” हे अभियान लोकसहभागातून यशस्वी होईल यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या या शंभर दिवसांच्या अभियानामध्ये सर्व ग्रामस्थांनी आठवड्यातून एकदा श्रमदान व गावच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावावा .असे आवाहन ग्रामस्थांना केल्याने प्रत्येकजण यामध्ये आपापल्या परीने योगदान देत आहे.
मदन शेलार, ग्रामविकास अधिकारी, माण





