Suvendu Adhikari: पश्चिम बंगालमधील सुवेंदू अधिकारी सरकारने एका महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सर्व सरकारी शाळांमध्ये, तसेच सर्व सरकारी अनुदानित आणि मान्यताप्राप्त मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी ‘वंदे मातरम’ गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सरकारी आदेशानुसार, आता प्रत्येक मदरशात सभेदरम्यान राष्ट्रगीत गाणे अनिवार्य असेल. राज्याचे अल्पसंख्याक व्यवहार आणि मदरसा शिक्षण मंत्री खुदीराम टुडू यांनी या निर्णयाला दुजोरा दिला. जर इतर सरकारी शाळांमध्ये आणि संथाली भाषेत शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ अनिवार्य असेल, तर मान्यताप्राप्त मदरशांमध्ये ते अनिवार्य का करू नये? असा सवाल यावली त्यांनी उपस्थित केला. मदरसा शिक्षण संचालनालयाचा आदेश (Suvendu Adhikari) पश्चिम बंगाल मदरसा शिक्षण संचालनालयाने या संदर्भात एक आदेश जारी केला आहे. अधिकृत आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, हा नवीन नियम पूर्वीचे सर्व नियम आणि पद्धती रद्द करून तात्काळ प्रभावाने लागू केला जात आहे. यामध्ये अल्पसंख्याक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय मॉडेल मदरसे (इंग्रजी माध्यम), मान्यताप्राप्त अनुदानित मदरसे, मंजूर मदरसा शिक्षण केंद्रे, शिशु शिक्षण केंद्रे आणि मान्यताप्राप्त विनाअनुदानित मदरशांचा समावेश असेल. शासकीय शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गाण्याचा आदेश आधीच जारी (Suvendu Adhikari) यापूर्वी, १३ मे रोजी सायंकाळी, पश्चिम बंगाल शिक्षण विभागाने राज्यभरातील सर्व शासकीय शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गाणे अनिवार्य करणारी अधिसूचना देखील जारी केली होती. राज्याचे नवनियुक्त आणि नववे मुख्यमंत्री, सुवेंदू अधिकारी यांनी १४ मे रोजी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर शिक्षण विभागाची अधिसूचना शेअर केली. अतिरिक्त मुख्य सचिवांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, पश्चिम बंगाल सरकारने शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वीच्या प्रार्थना सभेत राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ गाणे तात्काळ प्रभावाने अनिवार्य केले आहे. (Suvendu Adhikari)