पुणे जिल्हा | विश्वकर्मा योजनेचा सुतार समाजाने लाभ घ्यावा

मंचर, (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणली आहे. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा. स्वतः तयार केलेली वस्तू याला योग्य तो मोबदला मिळणार आहे. तसेच आर्थिक मदतही व्यवसायासाठी शासकीय योजनेच्या माध्यमातून होणार आहे, अशी माहिती भाजप राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य धर्मेंद्र खांडरे यांनी दिली.
अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका पुणे जिल्हा आयोजित समाजभूषण गुणगौरव,शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मंचर (ता.आंबेगाव) येथे संपन्न झाला. याप्रसंगी प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य धर्मेंद्र खांडरे,भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय थोरात,गणपत अण्णा गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
भाजप नेते संजय थोरात म्हणाले की,सुतार समाजाचे योगदान मोठं आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कोणती अडचण आल्यास भाजप जनसंपर्क कार्यालय मंचर या ठिकाणी या ठिकाणी भेट द्या, मोफत सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. याप्रसंगी ह.भ.प भिकू महाराज आनंदराव,भरत महाराज अनंत, राम महाराज जाधव, रंगनाथ महाराज राजगुरू, दत्तात्रय महाराज भागवत, शांताराम महाराज आनंदराव,
शांताराम महाराज बारेकर यांना समाज गौरव विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये गायत्री भालेराव, कला क्षेत्रामध्ये राजश्री भागवत, अॅड. शुभांगी भागवत यांनी आपल्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवला म्हणून त्यांना समाज गौरव विशेष पुरस्कार देण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थी स्वामिनी भालेराव, ज्ञानेश्वरी कदम, प्रियंका भागवत, भाग्यश्री भागवत, निशा कदम, ओमकार भागवत, सिद्धी आनंदराव,कल्याणी मानमोडे,साक्षी भालेराव,कृष्णा जाधव, कार्तिक जाधव,ज्ञानेश्वरी राऊत,राजलक्ष्मी गायकवाड,वैष्णवी भागवत,निलांबरी पांचाळ यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ११० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हाध्यक्ष रवींद्र रायकर, पुणे जिल्हा महिलाध्यक्ष गायत्री श्रीसागर, शासकीय अधिकारी सुवर्णा पगार, पुणे जिल्हाध्यक्ष सुरेश अभंग, सरचिटणीस बाळासाहेब जाधव, आंबेगाव तालुकाध्यक्ष नितीन बारवकर, कार्याध्यक्ष संजय भालेराव,बाळासाहेब गाडेकर,कैलास गाडेकर, तसेच महासंघाचे पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन मिथुन पांचाळ यांनी केले.





