नवी दिल्ली सध्या युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे. रशिया आक्रमक असून युक्रेनवर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले आहे. मात्र या युद्धाला रशियन नागरिकांचा विरोध असून अनेकांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर पुतीन यांच्यावर टीका केली आहे. त्यातच आता पुतीन यांच्यावर टीका करणाऱ्या मॉडलचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मनोरूग्ण म्हणणाऱ्या रशियन मॉडेलचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मॉडेलचं नाव ग्रेटा वेडलेर असं असून तिने गेल्या वर्षी पुतिन यांच्यावर टीका केली होती.
पुतीन यांच्यावर टीका केल्यानंतर ग्रेटा गायब झाली होती. ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असायची. तसेच पुतीन यांच्याविरोधात सोशल मीडियावर लिहायची. त्यामुळे पुतीन समर्थकांचा तिच्यावर रोष होता. तिचे सोशल मीडियावर फॉलोवर्स खूप जास्त होते.
ग्रेटाने जानेवारी 2021मध्ये शेवटची पोस्ट केली, मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. नुकताच तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळला. ग्रेटाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर डिमिट्री कोरोविन (23) याने पैशांच्या वादातून तिची गळा दाबून हत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.