New Orleans Crash Suspect Killed : ओरलॅन्समध्ये ट्रक धडक प्रकरणातील संशयित चकमकीत ठार

न्यू ओरलॅन्स : न्यू ओरलॅन्समध्ये भरधाव ट्रकच्या धडकेमुळे १० जणांना ठार आणि ३० जणांना डखमी करणारा संशयित पोलिसांबरोबरच्या चकमकीमध्ये ठार झाला आहे. न्यू ऑरलॅन्समधील गजबजलेल्या फ्रेंच क्वार्टर जिल्ह्यात बुधवारी पहाटे ३.१५ वाजता बोरबोन स्ट्रीटजवळ आयोजित केलेल्या नववर्षाच्या स्वागतासाठीच्या पार्टीमध्ये संशयिताने भरधाव ट्रक घुसवला होता.
याच ठिकाणी एक फुटबॉलचा सामना देखील होणार होता. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. धडकेमुले १० जण ठार आणि ३० जण जखमी झाले होते. हा एक दहशतवादी हल्ला होता, असे न्यू ओरलॅन्सच्या महापौरांनी सांगितले. तर हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य होते, असे शहराच्या पोलीस प्रमुखांनीही म्हटले होते. मात्र ठार झालेला संशयित दहशतवादी नव्हता, असे एफबीआयच्या एजंटांनी म्हटले होते.
घटनास्थळी किमान एक स्फोटक यंत्र सापडल्याचा तपास अधिकारी करत होते. ट्रकमधून संशयिताने केलेल्या गोळीबारात दोन पोलीस अधिकारी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अध्यक्ष ज्यो बायडेन यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे, असे व्हाईट हाऊसने सांगितले. तर ऍटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनाही हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली, असे न्याय विभागाने सांगितले.





