49 वर्षीय सुश्मिता सेन कधी लग्न करणार? चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत अभिनेत्री म्हणाली…

Sushmita Sen | बॉलीवुड अभिनेत्री सुश्मिता सेन 49 वर्षांची झाली आहे. आतापर्यंत सुश्मिताचे नाव अनेकांशी जोडले गेले. मात्र, अभिनेत्रीने लग्न केलेले नाही. त्यामुळे तिला वारंवार लग्न कधी करणार? या प्रश्नाला सामोरे जावे लागते. आता स्वतः सुश्मिताने लग्न कधी करणार याबाबतचा खुलासा केला आहे. एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तिने लग्नाबाबत माहिती दिली.
मिस यूनिव्हर्स असलेल्या सुश्मिताने लग्न आणि योग्य जोडीदार शोधण्याबाबत मत व्यक्त केले. तिने इंस्टाग्राम लाईव्ह सेशनचे आयोजन केले होते. यावेळी तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी बोलताना तिने तिच्या भविष्यातील प्लॅनिंगबद्दलही सांगितले. सुश्मिताने आतापर्यंत अनेकदा स्वतंत्रपणे जीवन जगण्याबद्दल स्पष्टपणे भाष्य केले. यावेळी तिने तिचा जोडीदार कसा असावा याबाबत मत मांडले.
चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुश्मिता म्हणाली की, ‘मलाही लग्न करायचं आहे. पण, लग्नासाठी योग्य असे कोणीतरी मिळायलाही हवे ना. लग्न असेच तर होत नाही. असं म्हणतात की मनाचे नाते खूप रोमँटिक पद्धतीने जोडले जाते. ती व्यक्ती मनापर्यंत पोहचली की लग्न पण करेल.’
सुश्मिताच्या या उत्तरामुळे तिचे चाहते देखील आनंदी झाले आहेत. अभिनेत्री कधी लग्न करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, याआधी सुश्मिताचे अनेकांशी नाव जोडले गेले आहे. लव्ह लाइफमुळेही ती चर्चेत राहिली आहे.
सुश्मिता सेन आणि अभिनेता रोहमन शॉल रिलेशनशिपमध्ये होते. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2021 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर तिचे नाव ललित मोदीशीही जोडले गेले होते. मात्र, नंतर दोघांचेही नाते देखील संपुष्टात आल्याची चर्चा रंगली. तसेच, सुश्मिता अविवाहित असली तरीही ती दत्तक घेतलेल्या दोन मुलींचा सांभाळ करते.





