‘चिऊताई चिऊताई दार उघड’… पहिल्यांदाच आयटम साँगमध्ये झळकली अमृता, ‘चंद्रा’चा भन्नाट डान्स बघितला का?

Amruta Khanvilkar | अभिनेता स्वप्नील जोशीचे एकामागोमाग एक अनेक हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्वप्नीलची प्रमुख भूमिका असलेले ‘जिलबी’ आणि ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले आहेत. आता अभिनेता ‘सुशीला – सुजीत’ एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटातील नवीन गाणे रिलीज झाले आहे.
‘सुशीला – सुजीत’ चित्रपटातील “चिऊताई चिऊताई दार उघड” हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. विशेष म्हणजे या आयटम साँगमध्ये लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हटके अंदाजात दिसत आहे. अमृताने तिच्या अभिनय प्रवासात पहिल्यांदाच आइटम साँगमध्ये काम केले आहे. अमृतासोबत या गाण्यात अभिनेता गश्मीर महाजनी देखील आहे.
View this post on Instagram
आतापर्यंत सुपरहिट लावण्या सादर केल्यानंतर आता अमृता पहिल्यांदाच ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ या आयटम साँगच्या माध्यमातून वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.’ सुटता सुटेना बंद दारामागची कोडी, भन्नाट स्वॅग घेऊन आलीये गश्मीर – अमृताची जोडी’, अशा मजेशीर कॅप्शनसह अमृताने या गाण्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या गाण्यातील अमृताचा हटके लूक प्रेक्षकांना देखील आवडला आहे. या आयटम साँगद्वारे अमृता प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.
दरम्यान, अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका भूमिका असलेला ‘सुशीला – सुजीत’ 18 एप्रिलला मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. सिनेमाची निर्मिती ही स्वप्नील जोशी याच्यासह मंजिरी व प्रसाद ओकनं केली आहे. तर दिग्दर्शन प्रसाद ओकचे आहे.




