पाटणा – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले. मुंबई पोलीस या प्रकरणी हाट प्रोफाईल लोकांची चौकशी करत असताना तिकडे सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या विरोधात पाटण्यात तक्रार दाखल केली आहे. यातच आता या प्रकरणात पोलिसांकडून अंकिता लोखंडेचीही चौकशी करण्यात आली आहे.
Mumbai: A team of Bihar Police leaves from the residence of actor Ankita Lokhande after questioning her in connection with the death case of actor #SushantSinghRajput https://t.co/17mOJJr4Ub pic.twitter.com/OwMnWqmDJR
— ANI (@ANI) July 30, 2020
मिळालेल्या माहितीनुसार,’२०१९ मध्ये अंकिताने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या दरम्यान तिला शुभेच्छा देण्यासाठी सुशांतने तिच्याशी संपर्क साधला होता. यावेळी सुशांतने अंकिताला सांगितलं की,’रियामुळे त्याला त्रास होत होतं आहे. याचा पुरावा म्हणून अंकिताने सुशांतचे मेसेज देखील पोलिसांना दाखवले होते. याच संदर्भात सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री अंकिता लोखंडेची चौकशी केली.