Rhea Chakraborty : दिवंगत अभिनेता सुशातसिंह राजपूतची एक्स गर्ल फ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने मोठा निर्णय घेत सोशल मीडियावरुन भावूक पोस्ट शेअर केली आहे. काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर जाण्याचा निर्णय तिने घेतला आहे. सततचा गोंगाट, ट्रोलिंग आणि तुलना यांच्या ताणामुळे स्वतःपासून दूर गेल्यासारखे वाटत असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे. रिया चक्रवर्तीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “सततचा गोंधळ, स्क्रोलिंग आणि इतरांशी स्वतःची तुलना करत राहणे अपेक्षेपेक्षा जास्त थकवणारं ठरत आहे. मला शांततेची आठवण येतेय… अशा जागेची आठवण येतेय जिथे मला कोणी जज करत नाही.” तिने पुढे लिहिले की, आता काही काळासाठी आयुष्याचा वेग कमी करून स्वतःसोबत वेळ घालवण्याची गरज आहे. “पोस्ट करण्याऐवजी मला त्या क्षणांमध्ये जगायचं आहे. एक दीर्घ श्वास घेऊन माझ्या खऱ्या अस्तित्वाशी पुन्हा जोडून घ्यायचं आहे.” ( Rhea Chakraborty) Rhea Chakraborty : सुशांतसिंह राजपूतच्या एक्स गर्लफ्रेंडने घेतला मोठा निर्णय! सोशल मीडियावरील भावूक पोस्ट व्हायरल रिया चक्रवर्तीच्या या पोस्टनंतर तिचे चाहते भावुक झाले असून अनेकांनी तिला धीर देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिला आनंदी राहण्याचा सल्ला दिला आहे, तर काहींनी तिच्या मानसिक शांततेसाठी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केलं आहे. (Rhea Chakraborty) सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती प्रचंड चर्चेत आली होती. त्या प्रकरणात तिच्यावर अनेक आरोप झाले होते आणि तिला काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यानंतर सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या सर्व संकटांवर मात करत रियाने पुन्हा कामाच्या जगात पुनरागमन केले. मात्र, आता तिने स्वतःसाठी काही काळ शांतता आणि एकांत निवडत सोशल मीडियापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. हेही वाचा : Marathi Serial: ‘वीण दोघांची ही तुटेना’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट! शेअर केले Unseen Photos