Suryakumar Yadav : सूर्याने पाहिला ‘छावा’ दिली तीनच शब्दांत प्रतिक्रिया म्हणाला…; विकीने दिला हटके शैलीत रिप्लाय

१४ फेब्रुवारीला चित्रपटातगृहात रिलीज झालेल्या छावा चित्रपटाची बॅाक्स अॅाफिसवर यशस्वी घोडदौड कायम आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने तब्बल ५०० कोटींची कमाई करत या वर्षातील पुष्पानंतर दुसरा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान मिळवला आहे. छावा चित्रपटाला प्रेक्षक भरभरून दात देत सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
सिनेमा इंडस्ट्रीमधील अनेकांनी छावा चित्रपटाविषयी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. नुकताच भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने छावाच कौतुक करत तीन शब्दांमध्ये प्रतिक्रिया देत चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्याने दिलेल्या तीन शब्दांच्या प्रतिक्रियेला अभिनेता विकी कौशलनेही हटके शैलीत रिप्लाय दिला आहे.
चॅम्पियन्स ट्रॅाफी २०२५ ची स्पर्धा दुबईत खेळली जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी देखील उत्तम राहिले आहे. २ मार्च रोजी न्यूजीलंड आणि भारताचा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ आधीच सेमी फायनलसाठी पात्र ठरलेला आहे. या स्पर्थेसाठी दुबईत गेलेल्या भारतीय संघात सूर्यकुमारचा समावेश नाही. त्यामुळे घरी बसून असलेल्या सूर्याने छावा चित्रपट पाहून काढला आहे.
त्यानंतर त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर विकीचा छावामधील एक सीनमधील एक फोटो शेअर केला आहे. “भावा प्रॉपर छावा” असे या फोटोवर सूर्यकुमारने लिहिले आहे. विकीनेही सूर्यकुमारच्या या स्टोरीला रिशेअर करताना ‘भावा’ असं लिहून केलेल्या कौतुकाची दखल घेतली आहे.
आतापर्यंत छावा रिलीज झाल्यापासून म्हणजेच १४ दिवसांमध्ये बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ घातला असून जगभरातील सिनेमागृहांमध्ये ५५५ कोटी ३० लाख रुपयांची कमाई केली आहे. अजूनही प्रेक्षक छावा थिएटर्समध्ये जाऊन बघत आहे. येत्या काही दिवसांत छावा पुष्पा २ लाही कमाईच्या बाबतीत टक्कर देऊन मागे पाडू शकतो असे बोलले जात आहे.





