पिंपरी : सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले पिंपळे निलख येथील ओबीसी समाजासाठी झटणारे ज्येष्ठ समाजसेवक सुरेश गायकवाड यांनी आप आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी अरुणा गायकवाड या २००२ ते २००७ या काळात नरसेविका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पिंपळे निलख परिसरात आम आदमी पक्षाचे संघटन अधिक बळकट होणार आहे, असा विश्वास पदाधिकार्यांनी व्यक्त केला. गायकवाड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी आणि स्थानिक विकासासाठी लढा दिला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पिंपळे निलख परिसरात अनेक सामाजिक उपक्रम आणि प्रकल्प राबवले गेले आहेत. आप आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अजित आपके यांच्या हस्ते व पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षाचे वैजनाथ शिरसाट, प्रकाश हगवणे, यल्लाप्पा वालदोर, पुणे शहर युवक शहराध्यक्ष अमित मस्के, दत्तात्रेय काळजे, चंद्रमणी जावळे, सुनील शिवशरण, शुभम यादव, अजय सिंग आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.