Janhvi Killekar : बिग बॅासच्या पाचव्या पर्वात आपली चमकदार कामगिरी करत विजेता ठरलेला सर्वांचा लाडका सूरज चव्हाण याचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सूरजने विवाहसोहळ्यासाठी अनेक मान्यवरांची नावे लग्नपत्रिकेत लिहिली होती. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. अनेकांनी त्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. पण या साऱ्यात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, तिला कोणाची नजरी लागली असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कारण सूरजच्या लग्न सोहळ्यानंतर जान्हवी थेट रुग्णालयात दाखल झाली असून, तिने सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. २९ नोव्हेंबरला सूरज आणि संजनाचा डोळे दिपवणारा विवाहसोहळा पुणे-पंढरपूर रस्त्याशेजारी एका मंगल कार्यालयात पार पडला. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने हळदी समारंभापासून ते लग्नसोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जान्हवीने सूरज आणि त्याच्या बायकोसोबत डान्सही केला. पण, आता सूरजचे लग्न आणि तिथे अगदी कलवरीसारखं मिरवणे जान्हवीला चांगलचं महागात पडले आहे. सूरजच्या लग्नावरुन परतल्यावर जान्हवीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जान्हवीने रुग्णालयातला फोटो शेअर करुन सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये जान्हवीला रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. “नजर इज रिअल”. असे पोस्टमध्ये जान्हवीने म्हटले आहे. तिचा रुग्णालयातील फोटो पाहून चाहते कमेंट्स करत काळजी व्यक्त केली आहे. “छान दिसत होती म्हणून नजर लागली असेल…”, असे एका युजरने म्हटले आहे. तर तब्येतीची काळजी घे असे एका चाहत्याने म्हटले आहे. सूरजच्या लग्नात मोठी गर्दी झाली होती, यावरून जान्हवीने संताप व्यक्त केला होता. तिचा संताप व्यक्त करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्येतीविषयी मोठा खुलासा ; MRI रिपोर्टसंदर्भात व्हाईट हाऊसने दिली ‘ही’ माहिती