लोणीधामणी : शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील सरपंच पदाची निवडणूक पार पडली असून सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने सुप्रिया मनोज तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळत्या सरपंच जयश्री संतोष तांबे यांनी काही दिवसांपूर्वी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पद रिक्त झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक पार पडली. यावेळी मंडल अधिकारी विश्वास शिंदे व ग्रामसेवक अनिल टेमकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. माजी सरपंच जयश्री तांबे यांनी नवनियुक्त सरपंच सुप्रिया तांबे यांचा सत्कार केला. यावेळी उपसरपंच बिपिन चौधरी, माजी उपसरपंच मयूर सरडे, गणेश तांबे, तानाजी महाराज तांबे यांनी नवनियुक्त सरपंच यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सरपंच मनोज तांबे, माजी सरपंच वंदना तांबे,पोलीस पाटील कल्पना चौधरी,विजया चौधरी, माजी चेअरमन कांताराम तांबे, कोंडिभाऊ तांबे, राजेंद्र चौधरी, राघू रणपिसे,सोसायटी संचालक जयदीप चौधरी, शंकर तांबे, स्वप्नील तांबे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.