सांगली – आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या हरणार असल्याचे भाकीत, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सांगली येथील कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा बारामतीतून पराभव नक्की असल्याचे म्हंटले आहे.
सांगलीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारसभे दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे हरणार असल्याचे सांगत, नेमके किती मतांच्या फरकाने हरणार हे स्पष्ट होण्यासाठी प्रचाराचे अजून १५ दिवस बाकी असल्याचे म्हंटले आहे. बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत, तर भारतीय जनता पक्षाकडून कांचन कुल याना उमेदवारी देण्यात आलेली आहे.