Supriya Sule : “सरकार मान्य का करत नाही?”; गॅस सिलिंडर तुटवड्याप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल
Supriya Sule : अर्थव्यवस्था कोलमडून पडेल अशी स्थिती असल्याने सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे - सुप्रिया सुळे

Supriya Sule : मध्य पूर्वेत तीव्र तणाव निर्माण झाला असून, जगातील ऊर्जा बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. इराणने होर्मुज स्ट्रेट प्रभावीपणे बंद केल्यामुळे जगातील सुमारे २०% कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस यांची वाहतूक थांबली आहे.
या स्ट्रेटमधून भारताच्या मोठ्या प्रमाणात आयात होणारे तेल आणि गॅस अडकले असल्याने देशात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. अनेक हॉटेल्स आणि व्यावसायिक संस्थांना कमर्शियल गॅस न मिळाल्याने बंद पडण्याची वेळ आली आहे.Supriya Sule
या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सरकारला सुनावले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मान्य का करत नाही? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? Supriya Sule
“गॅसचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी ५० टक्के काम बंद झालं आहे. तशीच परिस्थिती बारामतीत आहे. बारामतीत सगळे व्यवसाय करणारे आहेत त्यावेळी अनेकांनी माझी भेट घेतली. व्यावसायिक गॅस मिळत नाही. रेस्टॉरंट बंद झाले आहेत, लघुउद्योग बंद झाले आहेत.
दौंड, इंदापूर या भागांमध्ये गॅस तुटवड्यामुळे ७५ टक्के कामगार कमी केले आहेत. सरकार देशात गॅसचा तुटवडा भासतोय हे वास्तव मान्य का करत नाही?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “लघू उद्योग, खानावळी, महिला भगिनी ज्या घरातून काही व्यवसाय करतात तिथे अडचणी येत आहेत. रांगा लावून पुरुषांना किंवा महिलांना गॅस आणावा लागतो आहे.
‘राहुल गांधींनी मांडलेले मुद्दे खरं होताना दिसतायत’ Supriya Sule
“पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझी हात जोडून विनंती आहे की, त्यांनी गॅस सिलिंडर संदर्भात जी एक मोठी जाहीरात केली होती त्यात त्यांनी म्हटलं होतं की, डोळ्यांतून अश्रू आणि खोकला येता कामा नये कारण चूल नको. आपण लोकांनी सबसिडी सोडून दिल्या. आज त्याच कष्टकरी महिलांना सिलिंडर मिळत नाही.”
“अर्थव्यवस्था कोलमडून पडेल अशी स्थिती आहे. त्यामुळे सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे. कारण हा राजकीय विषय राहिलेला नाही. देशातल्या लोकांना वास्तव काय ते सांगितलं पाहिजे. कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागू शकतो. राहुल गांधी यांनी तुटवड्याबाबत जे मुद्दे मांडले ते आता दोन आठवड्यांनी खरं होताना दिसतं आहे,” असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. Supriya Sule
बारामती, पुणे, नाशिक, बीड, जळगाव, नागपूरमध्ये ही परिस्थिथी आहे. फक्त राज्यात नव्हे तर भारतातही सगळीकडे हीच परिस्थिती आहेत. रांगा लाऊन गॅस मिळायचा पण आता मिळत नाही. सरकार जे सांगतं आहे आणि जे वास्तव आहे त्यात सामान्य माणूस भरडला जात आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे’
“गॅसचा तुटवडा आहे हे भारत सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे का लपवत आहेत? मला ते समजतच नाही. तुटवडा आहे तर कृती आराखडा का आखला जात नाही? जिल्हाधिकारीही तेच बोलत आहेत जे सांगितलं गेलं आहे. भारतात एलपीजीची सगळी यंत्रणा कोसळली आहे.
आत्ताची वेळ ही कुठलाही विरोध करण्याची नाही, हा राजकीय विषय नाही, या समस्येतून मार्ग काढण्याची वेळ आहे. मी कुणावर आरोपच करत नाही. मात्र आता केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे आणि जनतेला जे वास्तव आहे ते सांगितलं पाहिजे, ” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. Supriya Sule
हेही वाचा:
Chhatrapati Sambhajinagar : ‘कापून टाकू, ठोकून टाकू…’; ठाकरेंच्या शिलेदाराला धमकीचे फोन






