मुंबई – मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचा वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध सध्या सोशल मिडियावर होत आहे. ते म्हणाले की, भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणं कठीण असल्याचं वक्तव्य निती आयोगाचे केलं आहे. कठोर सुधारणांशिवाय चीनशी स्पर्धा करणं सोपं नाही. त्यांच्या या विधानावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमिताभ कांत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतंय, हे वरीष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्याचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. त्याचा तीव्र निषेध.भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.https://t.co/B4SM2VJi2K
— Supriya Sule (@supriya_sule) December 9, 2020
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
“भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतंय, हे वरीष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्याचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. त्याचा तीव्र निषेध. भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे”.